breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#SSRCase: रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

मुंबई: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केलेली आहे. सायंकाळी साडे चार वाजता तिची आरोग्य तपासणी आणि कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल 10 तास रियाची चौकशी झालेली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. गेलेले दोन दिवस तिची दहा तास चौकशी करण्यात आलेली आहे. त्यानंतर आजच्या पाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केलेली आहे. त्यानंतर तिला आरोग्य तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button