breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राज्यात १७६१ कोरोनाग्रस्त; ७० टक्के रुग्ण धोक्याबाहेर – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७६१वर पोहचली आहे. त्यापैकी ७० टक्के रुग्ण धोक्याबाहेर आहेत. तर ५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८७ रूग्ण वाढले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतच १०००हून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये ९१ टक्के रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत ६१ टक्के कोरोनाबाधित आहेत. तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ९ टक्के रुग्ण आहेत. शहरी भागात अधिक रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.