breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ssc exam- भाषा विषयात 65 विद्यार्थी काॅपी करताना आढळले

पुणे |महाईन्यूज|

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भाषा विषयात राज्यभरात तब्बल 65 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यामध्ये सर्वाधिक 20 प्रकरणे अमरावती विभागात आढळून आली असल्याची माहिती राज्य मंडळातर्फे देण्यात आली.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारी राज्यभरात सुरुवात झाली. राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात आलेल्या भाषा विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करताना तब्बल 65 कॉपीबहाद्दर आढळून आले. यामध्ये सर्वाधिक 20 कॉपी केसेस अमरावती विभागात आढळून आल्या.

नागपूर विभागात 13, नाशिक विभागात 12, औरंगाबाद विभागात 11, लातूर विभागात 8 आणि पुणे विभागात 1 कॉपी प्रकरणे आढळली. कोल्हापूर, कोकण आणि मुंबई विभागात एकही कॉपी केस आढळून आली नसल्याची माहिती मंडळाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button