breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

Nagaland : राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार

एनडीपी आणि भाजपा समर्थित आघाडीला स्पष्ट बहुमत

नागालँड : नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजपा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळं नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मात्र, भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजपा समर्थित आघाडीला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना कोणत्या इतर पक्षांची गरज नाही. पण तरी राज्याचा पूर्व इतिहास बघता सगळेच पक्ष सत्तेत सहभागी व्हायला निघाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्याच मार्गानं जाणार का? अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एनडीपीपीनं २५ तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ७ , एनपीपीनं ५ आणि नागा पीपल्स फ्रंट, लोजप(रामविलास) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. त्याबरोबरच जेडीयूनं एक जागा जिंकली आहे, तर चार अपक्षांनीही विजय मिळवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button