Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांची घोषणा : भारतीय संविधानाची पत्र देऊन केले अभिनंदन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टी आणि शहरासाठी समर्पण भावनेतून काम केले आहे. आज त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. तसेच, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित भावनेतून काम करणाऱ्या बाबर कुटुंबियांतील शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होत आहे. ही किमया फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे, असे मला वाटते, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतला. सुमारे 4 वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर महापालिका सभागृहात पहिली बैठक झाली. या बैठकीत महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सत्तारुढ पक्षनेते यांची निवड करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या ‘‘शाश्वत विकासासाठी’’ आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांच सभागृहाचे कामकाज आज सुरू झाले, याचे मनोमन समाधान आहे.

आनंदोत्सव नाही, संविधानाची प्रत भेट…

भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक यांना विनंती करतो की, लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधन झाले.त्याला आजून 12 दिवसही झालेले नाही. त्यामुळे आपण राजकीय संवेदनशीलता म्हणून कोणताही आनंदोत्सव साजरा करणार नाही. त्या अनुशंगाने सर्वांनी दक्षता घ्यावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ‘‘भारतीय संविधान’’ची पत्र देवून शुभेच्छा दिल्या.

निष्ठा-समर्पण आणि शाश्वत विकास ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाची त्रिसूत्री असेल. त्या अनुशंगाने आम्ही सर्वजण एकजुटीने पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहोत. भारतीय संविधान आणि देव-देश-धर्म-संस्कृती संवर्धनाचा संकल्प आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहर देशातील विकासित शहरांमध्ये नंबर- 1 राहील. हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संकल्प करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button