कोणत्या क्रिकेटपटूने किती कोटींचा टॅक्स भरला? पाहा संपूर्ण यादी..
Income Tax | क्रिकेटपटू हे क्रिकेट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करत असतात. त्याचबरोबर आयपीएल आणि इतर विविध लीग सामन्यांमुळे मोठी कमाई होते. यासह बक्कळ कमाई करणारे खेळाडू कर किती भरतात हा देखील एक उत्सुकतेचा मुद्दा आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात २०२३-२४ मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने सर्वाधिक कर भरला आहे, जाणून घ्या..
फॉर्च्यून इंडियाच्या यादीनुसार, भारताचे कर भरणारे टॉप-५ क्रिकेटपटूंची नावे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक तब्बल ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न १९०० कोटींपेक्षा जास्त आहे. तर २०२३-२४ मध्ये कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे.
हेही वाचा – मंद तारकांनी मैत्री कट्ट्याचे तारांगण फुलवले
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०२३-२४ मध्ये धोनीने ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. धोनी या वर्षी सर्वाधिक कर भरणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा तिसरा सर्वाधिक कर भरणार भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनची एकूण संपत्ती १४३६ कोटी रुपये आहे. तर २०२३०-२४ मध्ये सचिन तेंडुलकरने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर या यादीत सौरव गांगुली चौथ्या स्थानी असून त्याने २०२३-२४ साठी २३ कोटी कर भरला आहे तर हार्दिक पंड्याने १३ कोटी कर भरला आहे.
सर्वाधिक कर भरणारे टॉप ५ भारतीय सेलिब्रिटी
शाहरुख खानने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. शाहरुखनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार थलापति विजयचं नाव या यादीत आहे. तामिळ सुपरस्टारने ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर सलमान खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ७५ कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभ बच्चन यांनी २०२४ या आर्थिक वर्षात ७१ कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर क्रिकेटपटू विराट कोहली ६६ कोटी रुपयांचा कर भरून या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.