ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

विराट आणि अनुष्का मुलांच्या रुटीनबद्दल शिस्तबद्ध

मुलांच्या जेवणाच्या आणि झोपणाच्या वेळा पाळतात काटेकोरपणे

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच भारतात परतली असून सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात अनुष्काने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ती तिच्या मुलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ”विराट आणि मी आमच्या आणि मुलांच्या रुटीनबद्दल खूप शिस्तबद्ध आहोत. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी जेवणाच्या आणि झोपणाच्या वेळा काटेकोरपणे पाळतो”, असं तिने म्हटलंय. विराट आणि अनुष्का हे कोट्यवधींचे मालक आहेत. त्यांच्या घरात नोकराचाकरांची सतत रेलचेल असते. तरीही आपल्या मुलांसाठी विराट आणि अनुष्का आवर्जून एक काम करतात. हे काम कोणतं आहे, याचाही खुलासा अनुष्काने या कार्यक्रमात केला.

अनुष्का म्हणाली, आम्ही घरीसुद्धा याबद्दल चर्चा करतो की जर आमच्या आईने आमच्यासाठी जे जेवण बनवलं, ते आम्ही मुलांसाठी नाही बनवलं तर पुढच्या पिढीकडे ती गोष्ट कशी पोहोचणार? त्यामुळे कधीकधी मी जेवण बनवते आणि कधी माझा पती मुलांसाठी जेवण बनवतो. आमच्या आईने ज्या पद्धतीने आमच्यासाठी जेवण बनवलं होतं, आम्ही तसंच आमच्या मुलांसाठी बनवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी मी आईला फोन करून रेसिपी विचारून चिटींगसुद्धा करते. पण असं करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत अत्यंत मौल्यवान काहीतरी पोहोचवताय, असा त्याचा अर्थ होतो.

मुलांच्या रुटीनविषयी बोलताना अनुष्का पुढे म्हणाली, मी रुटीनबद्दल खूप शिस्तबद्ध आहे. आम्ही कुटुंब म्हणून खूप ट्रॅव्हल करतो आणि त्यामुळे माझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच बदलांना सामोरं जावं लागतं. त्यांच्यासाठी एक रुटीन तयार करून एका अर्थाने मी त्यांना नियंत्रित करतेय. आमच्या जेवणाची वेळ ठरलेली आहे. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही असलो तरी आम्ही त्या ठरलेल्या वेळेतच जेवतो आणि झोपतो. त्यामुळे स्वत:चं नियमन करणं त्यांच्यासाठी सोपं जातं.

अनुष्का नुकतीच लंडनहून मुंबईत परतली आणि मुंबईत आल्या आल्या ती एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली. बऱ्याच काळानंतर मीडिया आणि चाहत्यांसमोर आल्याने मला खूप चांगलं वाटतंय, अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली. अनुष्काने इन्स्टाग्रामवर काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button