राजकारणात जाणार का? गौतमी पाटीलने दिलं भन्नाट उत्तर
Gautami Patil | नृत्यांगना गौतमी पाटीलची प्रसिद्धी आणि तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे दोन प्रश्न सतत उपस्थित होतात. एक प्रश्न असतो गौतमी पाटीलच्या लग्नाचा आणि दुसरा असतो ती राजकारणात कधी जाणार याचा? आता अमरावतीत पहिल्यांदाच आलेल्या गौतमीने राजकारणात कधी जाणार यावर भाष्य केलं आहे.
गौतमी पाटील म्हणाली, मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांना मी भेटले आहेत, प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं.
हेही वाचा – कोणत्या क्रिकेटपटूने किती कोटींचा टॅक्स भरला? पाहा संपूर्ण यादी..
गौतमी पाटील राजकारणात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, राजकारण आणि माझा काही संबंध नाही. मी राजकारणात जाणार नाही. मी कलाकार आहे. मी माझी कला सादर करत असते. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही आज हे पुन्हा एकदा सांगते मी राजकारणात जाणार नाही.
बाहेरुन शिक्षणासाठी अमरावतीत येणाऱ्या मुलांना आणि मुलींना मी सांगेन की तुम्ही या ठिकाणी बिनधास्त राहा. अन्याय झाला तर बिनधास्त नडा, कुणाच्याही दबावाखाली राहू नका. तसंच स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला गौतमी पाटीलने विद्यार्थ्यांना दिला आहे.