शालेय जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धा उत्साहात
शिक्षण विश्व : १४३ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी | क्रीडा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व क्रीडा परिषद पुणे–पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच युनिफाईट स्पोर्ट्स असोसिएशन, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने २० डिसेंबर २०२५ रोजी शालेय जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कावेरी नगर क्रीडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड क्रीडा पर्यवेक्षक श्री. दीपक कान्हेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत माने (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड युनिफाईट संघटना), श्री. सुरेश कोळी, सर विष्णुपंत पाटील, सर किरण अडागळे, प्रफुल सर व संदीप माने आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : ‘टँकरमुक्त डुडूळगाव आणि सर्वांगीण विकास’ हेच माझे ध्येय : अनुराधा साळुंके
या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव; एम.एम. विद्यामंदिर, काळेवाडी; पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल, काळेवाडी; मातृ विद्यालय, वाल्हेकरवाडी; एसएनबीपी स्कूल; सेंट पीटर्स स्कूल; सिम्बायोसिस कॉलेज, किवळे; विद्या विकास प्रशाला; जुडसन हायस्कूल; बालाजी स्कूल; ज्ञानप्रभात विद्यालय आदी शाळांमधील एकूण १४३ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.





