Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘टँकरमुक्त डुडूळगाव आणि सर्वांगीण विकास’ हेच माझे ध्येय : अनुराधा साळुंके

जनसंपर्क मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरणावर भर

पिंपरी-चिंचवड | डुडूळगाव परिसराचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना हक्काच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा दीपक साळुंके यांनी व्यक्त केला. “डुडूळगाव टँकरमुक्त करणे, दर्जेदार पाणीपुरवठा, चांगले रस्ते, प्रकाश व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक वाचनालय उभारणे ही माझी प्रमुख प्राधान्ये आहेत,” असे त्या म्हणाल्या.

डुडूळगाव परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी साळुंके यांनी नुकतीच व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली. श्री अडबंगनाथ महाराज मंदिर (डुडूळगाव), मोशी येथील श्री नागेश्वर महाराज मंदिर तसेच डुडूळगावमधील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेचा प्रारंभ केला. यानंतर त्यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला.

मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावणार..

या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा आणि वीज समस्यांबाबत आपल्या तक्रारी मांडल्या. यावर प्रतिक्रिया देताना साळुंके म्हणाल्या, “डुडूळगावमध्ये सुसज्ज रस्ते आणि प्रभावी प्रकाश व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे. पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते; ही परिस्थिती बदलून डुडूळगाव कायमस्वरूपी टँकरमुक्त करणे हेच माझे स्वप्न आहे.” त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक आणि बौद्धिक गरजांचा विचार करून सर्व सोयींनी युक्त असे आधुनिक वाचनालय उभारण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा      :        आळंदीत भाजपाचा महाविजय; नगराध्यक्षांसह २१ पैकी १५ जागांवर वर्चस्व!

महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम..

नागरी सुविधांसोबतच महिला सक्षमीकरणालाही साळुंके यांनी महत्त्व दिले आहे. “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकास उपक्रम राबवले जातील. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.

लोकसंपर्कातून वाढतोय विश्वास..

नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर ठोस उपाययोजनांची दिशा मांडल्यामुळे डुडूळगाव परिसरात अनुराधा साळुंके यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, त्यांच्या कार्याबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे. नागरिकांच्या सहकार्याने डुडूळगावला आदर्श आणि विकसित परिसर बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या जनसंपर्क मोहिमेमुळे परिसरातील सामाजिक व राजकीय चर्चांना वेग आला असून, अनुराधा साळुंके यांच्या कार्याची आणि भूमिकेची चर्चा नागरिकांमध्ये जोमाने सुरू आहे.

“डुडूळगावमधील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी, सुरक्षित रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्वांच्या सहकार्याने डुडूळगावला विकसित, स्वयंपूर्ण आणि आदर्श परिसर बनवू,”

– अनुराधा साळुंके, उमेदवार.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button