निर्भया प्रकरणाला 10 वर्षे उलटूनी महिला अद्याप असुरक्षित
जेमिमा रॉड्रिगेसने: भारताच्या महिला क्रिकेटरने सर्वांसमोर मांडलं जळजळीत सत्य; कोलकाता येथील प्रकरणाने सर्वांनाच बसलाय मोठा धक्का
नवी दिल्ली : कोलकाता येथील प्रकरणाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आपण एक माणूस म्हणून किती पुढारलेले म्हणत असलो तरी आपली मानसीकता मात्र बदललेली नाही. जे गेल्या काही वर्षांपूर्वी पाहायला मिळत होते, त्यामध्ये अजूनही बदल झालेला नाही आणि हीच गोष्ट जेमिमाही सांगायची आहे. कोलकात्यामधील बलात्काराच्या प्रकरणावर आता भारताच्या महिला क्रिकेटरने जळजळीत सत्य सर्वांसमोर मांडलं आहे. या क्रिकेटरने दशकापूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणाचा दाखला देत सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. भारताची युवा क्रिकेटर जेमिमा रॉड्रिगेसने म्हटले आहे की, ” अजून एक क्रूर बलात्कार. ही गोष्ट मला जाणीव करून देत आहे की, महिला सुरक्षित नाहीत. कुठेही त्याला सुरक्षित नाहीत. निर्भया प्रकरणाला एक दशक होऊन गेले. पण त्यानंतरही परिस्थिती अजूनही तशीच आहे, त्यामध्ये कोणताच बदल झालेला नाही.”
दशकापूर्वी भारतामध्ये झालेल्या निर्भया प्रकरणानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. भारतीय लोकांची मानसीकता त्यानंतर अजून बदललेली नाही. जेमिमाने सर्वात मोठी गोष्ट यावेळी मांडली आहे आणि ती म्हणजे, निर्भया प्रकरणाला आता एक दशक लोटून गेले आहे. पण त्यानंतरही भारतामध्ये महिला सुरक्षित नाहीत. कारण एका दशकानंतर पुन्हा तशीच गोष्ट भारतीय महिलेबाबत घडताना दिसत आहे. त्यामुळे जेमिमाने उद्वेगातून आपली ही भूमिका मांडलेली आहे.
जेमिमा ही भारताची युवा खेळाडू आहे. जेमिमाने आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे जेमिमाने भारतीय संघातील आपले स्थान अबाधित राखले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी वयात जेमिमाने आपले एक स्थान बनवले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा एक दबदबा आहे.
कोलकातामधील प्रकरणानंतर जेमिमाची ही पोस्ट क्रिकेट विश्वात चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण जेमिमाने यावेळी एक जळजळीत सत्य लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या आपल्या वक्तव्यामधून जेमिनाचा संताप पाहायला मिळत आहे. कारण दहा वर्षांमध्ये भारतात महिला अजूनही असुरक्षित आहेत, हे तिने यावेळी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.





