सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांचं मुंबई संघात पुन्हा एकदा कमबॅक
मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मेघालयला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

मुंबई : टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याने पुण्यात झालेल्या चौथ्या टी 20i सामन्यात विस्फोटक अर्धशतकी खेळी केली होती. तसेच शेवटच्या सामन्यातही शिवमने 30 धावांची सन्मानजनक खेळी केली. सूर्याला या मालिकेत बॅटिंगने काही खास करता आलं नाही. मात्र सूर्याने टीम इंडियाला कर्णधार म्हणून एकूण पाचवी टी 20i मालिका जिंकून दिली.
आता टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांचं मुंबई संघात पुन्हा एकदा कमबॅक झालं आहे. मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मेघालयला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबई क्वार्टर फायनलमध्ये हरयाणाविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समिताने संघ जाहीर केला आहे. या संघात सूर्या आणि शिवमचा समावेश करण्यात आला आहे. तसेच हार्दिक तामोरे, शार्दूल ठाकुर, आयुष म्हात्रे, अर्थव अंकोलेकेर यांचाही समावेश आहे.
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे?
शिवमला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेदरम्यान संधी मिळाली होती. त्यामुळे शिवमला मुंबई संघाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं होतं. मात्र आता टी 20i मालिकेनंतर शिवम आणि सूर्यकुमार दोघेही फ्री आहेत. या दोघांना इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोघे आता पुन्हा एकदा मुंबईकडून खेळताना दिसणार आहेत.
दरम्यान मुंबई विरुद्ध हरयाणा यांच्यातील क्वार्टर फायनल मॅच 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान चौधरी बंसी लाल क्रिकेट स्टेडियम, रोहतक येथे खेळवण्यात येणार आहे.
रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलसाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायास, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.