Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL2023 : आरसीबीच्या संघात मोठा बदल! न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूची एन्ट्री

इंग्लंडचा विल जॅक दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

IPL2023 : आयपीएल २०२३ लवकरच सुरू होणार आहे. मात्र, यापुर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. विल जॅक दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरूवातीच्या अगोदरच बाहेर झाला आहे. त्यामुळे आरसीबीने त्याच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल याला संघात एन्ट्री दिली आहे.

इंग्लंडचा विल जॅक्स नुकताच बांग्लादेश दौऱ्यावर जखमी झाला होता. आरसीबीने त्याला आयपएल लिलावात ३.२ कोटी रूपये खर्च करत संघात घेतला होता. जॅक्सच्या बाहेर पडल्याने आरसीबीला मोठा धक्का बसला होता. मात्र, आरसीबीने जॅक्सच्या जागी मायकेल ब्रेसवेलला १ कोटीच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले आहे. 

ब्रेसवेल आत्तापर्यंत १७७ टी-२० सामने खेळला आहे. त्याने १३३.४८ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २२८४ धावा केल्या आहेत. ज्यात १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या कालावधीत ४० विकेट्सही घेतल्या आहेत. त्यापौकी २१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button