क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे.

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या तिघांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड

दिल्ली : टीम इंडिया सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी 20मालिकेत टीम इंडियाचे युवा शिलेदार खेळत आहेत. तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका टीम इंडियासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंसह काही युवा क्रिकेटपटूंना या टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू हे बीसीसीआयच्या आवाहनानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांचा आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.

रोहित, श्रेयस आणि यशस्वी हे तिघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतात. हे तिघेही काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरूद्धच्या सामन्यात खेळले होते. मुंबईला जम्मू-काश्मीरकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता मुंबईचा पुढील सामना हा 30 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात मेघालयचं आव्हान असणार आहे. त्या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा  :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई विरुद्ध मेघालय हा सामना बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यासाठी रोहित, श्रेयस आणि यशस्वी उपलब्ध नसतील, अशी माहिती समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी नागपूरमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी या तिघांना हजर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हे तिघेही मेघालयविरुद्ध खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तसेच इंडिया-इंग्लंड यांच्यात 6 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.

शिवम दुबेही आऊट!
मेघालयविरुद्ध ऑलराउंडर शिवम दुबेही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवमची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

आयुषचं कमबॅक फिक्स!
दरम्यान रोहित आणि इतर खेळाडू मेघालयविरुद्ध खेळणार नसल्यानं इतरांना संधी मिळणार, असं म्हणता येईल. रोहितमुळे जम्मू-काश्मीरविरुद्ध आयुष म्हात्रे याला बाहेर बसावं लागलं होतं. मात्र आता त्याची पुन्हा एकदा प्लेइंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री होऊ शकते.

मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button