Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

पुणे : ऑक्टोंबर हिटनंतर नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडी सुरु झाली होती. मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये मध्यम पाऊस होणार आहे. तेलंगणा, अंदमान आणि निकोबार द्विप समूह, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत 

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button