‘विराटने मला इन्स्टाग्रमावर ब्लॅक केलं होतं..’; मॅक्सवेलचा मोठा खुलासा
Virat Kohli and Glenn Maxwell | ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने विराट कोहलीबाबतचा एक किस्सा सांगत मोठा खुलासा केला आहे. विराट कोहलीने इंस्टाग्रामवर ग्लेन मॅक्सवेलला ब्लॉक केले होते. तर, जेव्हा मला कळलं की मी RCB मध्ये जात आहे, तेव्हा विराट हा पहिला होता, ज्याने मला मेसेज करत संघात माझे स्वागत केले, असं मॅक्सवेलने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
मॅक्सवेल म्हणाला, की जेव्हा मला कळलं की मी RCB मध्ये जात आहे, तेव्हा विराट हा पहिला होता, ज्याने मला मेसेज करत संघात माझे स्वागत केले. नंतर जेव्हा मी आयपीएलपूर्वीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी गेलो होतो, तेव्हा आम्ही गप्पा मारल्या आणि प्रशिक्षणादरम्यान बराच वेळ घालवला. त्यामुळे त्यानंतर मी सोशल मीडियावर त्याला फॉलो करण्यासाठी गेलो. यापूर्वी मी कधी विचार केला नव्हता की त्याला फॉलो करू. माझ्या डोक्यातही तसं कधी आलं नव्हतं.
हेही वाचा – भाजपाचा नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध; आशिष शेलार म्हणाले..
मला हे माहिती होतं की तो सोशल मीडियावर तो असणारच. त्यामुळे मी आधी फार काही विचार केला नव्हता. पण जेव्हा मी सोशल मीडियावर सर्च करत होतो त्याला पण त्याचं अकाऊंट कुठेच दिसेना. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की त्याने कदाचित तुला इन्स्टाग्रावर ब्लॉक केलं असावं आणि म्हणूनच तू सर्च करूनही तुला तो दिसत नसेल. मला वाटलं असं काही नसेल. त्यानंतर मी गेलो आणि कोहलीला विचारलं, तू मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहेस का आणि तो म्हणाला, हो, मी तेव्हा ब्लॉक केलं होतं, जेव्हा तू कसोटी सामन्यात मला चिडवलं होतस, मी तेव्हा वैतागलो होतो आणि मग तुला सोशल मीडियावर ब्लॉक करायचं ठरवलं. त्यानंतर मी म्हटलं ठीके आणि मग त्याने मला अनब्लॉक केलं, त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो, असंही मॅक्सवेल म्हणाला.
विराटने मॅक्सवेलला का ब्लॉक केलं?
२०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांकडून बरीच आक्रमकता पाहायला मिळाली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. यावेळी क्षेत्ररक्षण करताना ग्लेन मॅक्सवेलने खांदा धरून कोहलीची त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे कोहली संतापला होता. तेव्हा कोहलीने त्याला ब्लॉक केले होते. पण मॅक्सवेलबरोबर बोलल्यानंतर कोहलीने त्याला अनब्लॉक केलं.