Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरे अन् भुजबळांना वगळलं? सुनेत्रा पवारांचा मध्यरात्री खुलासा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक यादी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री सोशल मीडियाद्वारे अधिकृत खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रकात असा दावा करण्यात आला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी निश्चित करून ती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव असून पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) म्हणून नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या पक्षाच्या पायास्तंभांची नावे यादीतून गायब असल्याने पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

हेही वाचा

पीएम मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे वक्तव्य, जनतेला काय सांगितले?

सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

हे पत्रक व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कार्यकारिणीच्या यादीत चुका असून लवकरच त्यात दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या या खुलाशामुळे व्हायरल झालेली यादी ही अंतिम किंवा पूर्णपणे अचूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक चुकांमुळे किंवा अपूर्ण माहितीमुळे ज्येष्ठ नेत्यांची नावे त्यातून सुटली असावीत, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना डावलले गेल्याच्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असून, लवकरच सुधारित आणि अधिकृत यादी पक्षाकडून जाहीर केली जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button