breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन विधानसभा: भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांचा झंजावात

प्रचारात आघाडी; तरुणाई मध्ये प्रचंड क्रेझ : आमदारांचा विकासाचा मुद्दा; विरोधकांकडे व्हिजन नाही

पिंपरी : भोसरी मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहेत. मतदारसंघात तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. दरम्यान आमदार महेश लांडगे विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांकडे विकासाचे कोणतीही व्हिजन नसल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.

महायुतीचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. पदयात्रा-गाठीभेटी, कॉर्नर सभा घेऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे संघटन कौशल्य, आमदार महेश लांडगे यांचे मायक्रो प्लॅनिंग आणि मुख्य म्हणजे मतदार संघात विखुरलेले कार्यकर्त्यांचे जाळे या महेश लांडगे यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत.

हेही वाचा    –      अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, २ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी 

समाविष्ट गावांमधून कामांची पावती …

भोसरी मतदारसंघांमध्ये समाविष्ट झालेल्या चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली यांसारख्या गावांमधून आमदार महेश लांडगे यांना कामाची पोचपावती मिळत आहे. तळवडे ते चऱ्होली हा भाग शहराच्या दोन टोकांना जोडतो. या भागांमध्ये चांगल्या प्रकारच्या रस्त्यांची बांधणी करत आमदार लांडगे यांनी हा मार्ग सुसाट केला आहे. पाण्याचा प्रश्न दृष्टिक्षेपात आणला आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधून आमदारांना मोठा लीड मिळणार असल्यास विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहे.

आमदारांकडे विकासाचा मुद्दा….

भोसरी मतदारसंघांमध्ये भाजपा विकास कामांचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या दहा वर्षातील महत्त्वाचा ठरलेला सरसकट शास्तीकर माफी, गायरानाची जागा शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देणे, समाविष्ट गावांमधील रस्त्यांचा प्रश्न सोडवणे , पाण्याची उपलब्धता मोशी कचरा डेपो येेथे वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस निर्मिती, सीएन्डडी वेस्ट प्रकल्प कार्यान्वयीत करणे बफर झोनची हद्दी कमी करणे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आयआयएम कॅम्पस आणि विशेष म्हणजे जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यात येत आहे. यासह विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आले असून हाच विकासाचा मुद्दा घेऊन आमदारांनी भोसरीचे मैदान गाजवले आहे .तर दुसरीकडे केवळ आरोप प्रत्यारोप करत विरोधक निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे विरोधकांकडे व्हिजनच नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button