मॅच फिक्सिंगमुळे दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना अटक
वन डे क्रिकेट जगात नंबर वन ठरलेल्या खेळाडूलाही या प्रकरणात अटक
मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकले आहेत. आफ्रिकेसाठी क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या आणि वन डे क्रिकेट जगात नंबर वन ठरलेल्या खेळाडूलाही या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. आफ्रिकेच्या एकूण तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
२०१५-१६ रामस्लॅम आणि टी-२० मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये अटक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे थामी सोलेकिल, लोनावो त्सोटोबे आणि एथी मबालाती या माजी खेळाडूंना अटक झाली आहे. तिघांवर 2004 च्या कलम 15 अंतर्गत भ्रष्टाचाराचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर लाच घेतल्याचा किंवा दिल्याचा आरोप आहे. तिन्ही खेळाडूंवर फिक्सिंगचा आरोप केला गेला होता 2016 मध्ये एका व्हिसलब्लोअरने स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याचे उघड झाल्यानंतर ही चौकशी सुरू झाली. नोव्हेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिथे त्याची सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. सोलेकिले यांना २८ तारखेला तर सोत्सोबेला २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध बराच काळ चौकशी सुरू होती.
अटक केलेल्या खेळाडूंमधील सोलेकिलेने याने ३ कसोटी सामने खेळले होते. मात्र त्याला खास काही कामगिरी करता आलेली नव्हती. तर एथी मबालाती याने आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने १२९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामधील लोनवाबो त्सोत्सोबे याने आफ्रिकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. ६१ वन डे सामन्यांमध्ये ९४ विकेट तर ५ कसोटीमध्ये ९ विकेट आमि २३ टी-२० सामन्यांमध्ये १८ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र २०१५ नंतर एकही सामना खेळलेला नाही.
दरम्यान, लोनवाबो त्सोत्सोबे हा जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज राहिला आहे. आपल्या करियरमध्ये त्याने वन डे फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम. एस. धोनीसारख्या दिग्गज फलंदाजांना आऊठ केले आहे. मात्र आता मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे करियला डाग लावून घेतलाय.