‘निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही’; अजित पवार
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आज (३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.
हेही वाचा – महाविकास आघाडीत बिघाडी, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा
तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही”.
अजित पवार म्हणाले, “मला बाबा आढाव यांना सांगायचं आहे की काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित असतात. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत.