हार्दिक पांड्याची इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात ५ विकेट हॉल घेणारा पहिला कर्णधार

मुंबई : हार्दिक पांड्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. हार्दिकने आजच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या आणि आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली. त्याने १६ वर्षांपूर्वी अनिल कुंबळेने नोंदवलेला विक्रम मोडला.
मिचेल मार्शने पहिल्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलला. त्याने ३१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ६० धावांची वादळी खेळी केली. पण, रोहित शर्माच्या टिप्सनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी चेंडूता वेग कमी केला अन् विकेट्स मिळवल्या. हार्दिक पांड्याने स्लोव्हर बाऊन्सरवर निकोलस पूरनला ( १२) झेलबाद केले. हार्दिकच्या संथ चेंडूवर रिषभ ( २) झेलबाद झाला. आयुष बदोनीने पु १९ चेंडूंत ४ चौकारांसह ३० धावांची खेळी केली.
हेही वाचा – ‘जीआयएसद्वारे सर्व्हे करून दर तयार करा’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
एडन मार्करमने संयमी खेळ करताना ३८ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. हार्दिकने शेवटच्या षटकात आणखी दोन विकेट्स घेताना पाच विकेट्सचा कोटा पूर्ण केला. आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच कर्णधार ठरला.
हार्दिकने कर्णधार म्हणून आयपीएल सामन्यात ३ वेळा ३ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेतल्या आङेत. शेन वॉर्नने पाचवेळा असा पराक्रम केला आहे. हार्दिकने आज अनिल कुंबळे व युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली. हार्दिकच्या नावावर एकूण कर्णधार म्हणून ३० विकेट्स घेतल्या आणि याही विक्रमक कुंबळेशी बरोबरी केली. शेन वॉर्न ५७ विकेट्ससह अव्वल आहे.हार्दिकने आज आर अश्विन ( २५), पॅट कमिन्स (२१) व झहीर खान ( २०) यांना मागे टाकले.
कर्णधार म्हणून सर्वोत्तम गोलंदाजी
5/36- हार्दिक पांड्या वि. LSG,2025*
4/16 – अनिल कुंबळे वि. DEC,2009
4/16 – अनिल कुंबळे वि. DEC,2010
4/17 – जेपी ड्युमिनी वि. SRH,2015
4/21 – शेन वॉर्न वि. DEC,2010
4/29 – युवराज सिंग वि. DC,2011