एकनाथ शिंदेकडे 75 नगरसेवक गेलेत, आता मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे राजकीय सोय; मंत्री चंद्रकांत पाटील यांची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrakant Patil : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे. हिंदुत्ववादी माणूस भावनिक आहे. मात्र ते राजकीय फायद्यासाठी एकत्र आले का कुटुंब म्हणून एकत्र आले, हे पहावं लागेल. तसेच इतके दिवस उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना घ्यावं वाटलं नाही. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत 75 नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेलेत. त्यामुळे आता राजकीय सोय म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतलं आहे. शिवाय राहिलेली मुंबई महापालिका ठेवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशी टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ठाकरे बंधूंचा मेळावा मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच या विजयी मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. त्यानंतर आता भाजपकडून ही या टीकेला प्रत्यूत्तर दिलं आहे.
हेही वाचा – सौर कृषी पंपाच्या तक्रारी करा मोबाईलवरून
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणात नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच हा मुद्दा सांगितला होता. मुंबई कशाला कोण तोडतंय, आम्ही का मेलो आहोत का? असा प्रतीप्रश्न ही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आठवले नाहीत राज ठाकरेचा मुलगा विधानसभेत थांबला तेव्हा आठवले नाहीत. आता राजकीय सोय म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना जवळ घेतलं आहे. मात्र ते किती दिवस एकत्र राहतील निवडणुकीपर्यंत राहतील का निवडणुकीच्या आधीच ते वेगळे होतील हे सांगता येत नाही. असेही ते म्हणाले