‘जीआयएसद्वारे सर्व्हे करून दर तयार करा’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : राज्यात रेडी रेकनरचे दर लागू करण्यात आले आहेत. यामध्ये क्षेत्रनिहाय दर असणे गरजेचे आहे. झोपडपट्टी, चाळी, औद्योगिक, वाणिज्यिक, पुर्नविकास आदींबाबत वेगवगळे दर असावे, यासाठी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत सर्व्हे करून क्षेत्रनिहाय दर तयार करावेत, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, मुंबई शहरामध्ये प्राधान्याने या सर्व्हेची सुरुवात करावी. सिटी सर्व्हे क्रमांकानुसार मुंबई शहरातील जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत सर्व्हे पूर्ण करावा. याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही पूर्ण करावी.
हेही वाचा – रूग्णालयातील दोषींवर कारवाई करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे धर्मादाय आयुक्तांना आदेश
याबाबत मुंबई शहरातील लोकप्रतिनिधींच्या सूचना घेण्यात याव्यात. रेडी रेकरनच्या दरामध्ये दुरुस्ती करायची असल्यास वर्षांतून दोनवेळा दुरुस्ती करण्याचे अधिकार शासनाकडे घेण्यात यावेत, याबाबत कार्यवाही करावी.