आधुनिक सॉफ्टवेअरच्या जगात नव्यानेच गिबली सॉफ्टवेअर ‘लॉन्च’
गिबली इमेज एक ऑनलाइन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन

जळगाव : आधुनिक सॉफ्टवेअरच्या जगात नव्यानेच गिबली हे सॉफ्टवेअर ‘लॉन्च’ झाले आहे. कधीकाळी कार्टून म्हटले, की लाजीरवाणे वाटणारा माणूस आता स्वतःहून कार्टून करवून घेण्यासाठी उतावीळ झाला आहे. नेता, अभिनेता कलावंतांनी असे गिबली कार्टून सोशल मीडियावर टाकल्याने अक्षरशः या ‘गिबली’ची त्सुनामीच आल्याचा अनुभव होतोय.
अत्याधुनिक संसाधनांनी मानवी जीवनात उत्क्रांती आणली. कधीकाळी संदेश वहनासाठी पत्र प्रपंच चालविला जायचा, त्याची जागा टेलिफोनने घेतली. नंतर मोबाईल आला. आता या ॲड्राॅईड मोबाईलने चक्क घड्याळ, कॅमेरा, टाईप रायटर, होकायंत्र यासह नको-नको ते गिळलयं.. इतकेच काय तर, मानव जातीच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही याचा अधिकाधिक प्रभाव जाणवू लागला आहे. तुम्ही जे बोलता ते लगेच टाईपिंग करुन मिळते. तुम्ही एखादी कमांड दिली, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे दिवसांचे काम काही सेकंदावर येऊन ठेपले आहे.
हेही वाचा – ‘जीआयएसद्वारे सर्व्हे करून दर तयार करा’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सोशल मीडियातून भावना…
माणसला व्यक्त होण्यासाठी पूर्वी मित्र, सवंगडी लागायचे. आता मात्र तो सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागला आहे. पसंती-नापसंती प्रेम, मैत्री, राग, मत्सर, द्वेष इतकेच नाही तर विचार धारेशी बांधील असल्याबाबतच्या पोस्ट करून तो स्वतःची ओळख ‘नेटिझन्स’च्या माध्यमातून करवून देत आहे. भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम बनले.
काय आहे गिबली
गिबली इमेज (Ghibli Image) एक ऑनलाइन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन (Studio Ghibli) आहे. फिल्म्स आणि त्यांच्याद्वारे बनविलेले अनोखे पात्र आणि दृश्ये प्रेक्षक या इमेजचे चित्र तयार करू शकतात. स्टुडिओ घिबली एक प्रसिद्ध जपानी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे. OpenAI ने आता चॅटजीपीटी मोफत ग्राहकांसाठी इमेज जनरेशन फीचर देणे सुरू केले आहे. सुरवातीला कंपन्याकडून हे ॲप्लिकेशन प्रमोशनसाठी मोफत वापरासाठी उपलब्ध केले जातात. नंतर त्यातून शुल्क आकारणी करण्यात येते.
कार्टून करून घ्यायचा ट्रेन्ड
कधीकाळी कुणाला कार्टून (विदूषक) म्हटले, की राग यायचा. एखाद्याला डिवचण्यासाठी किंवा कमीपणा दाखविण्याच्या उद्देशाने कार्टून म्हटले जात हाते. कार्टून म्हटले, की समोरच्यालाही तसा राग किंवा लाजीरवाणे वाटत होते. गिबली इमेजमुळे मात्र आता स्वतःला कार्टून करवून घेण्याचा जणू ट्रेन्ड आला असून, अशा फोटो-इमेजेसची जणू सोशल मीडियावर त्सुनामीच आली आहे. अधिकारी, नेता, पुढारी, कलावंत, नोकरदार, कामगार, विद्यार्थी-तरुण आपापल्या फोटोंसह गिबली इमेज शेअर करीत आहे.