Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

“अर्शदीपने माफी मागायची गरज नव्हती”, फायनलमधील ‘त्या’ वादावर गौतम गंभीरचं खळबळजनक विधान

Gautam Gambhir On Arshdeep Singh Throw: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना जिंकून भारतीय संघाने लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला होता. हा सामना पूर्णपणे एकतर्फी राहिला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५५ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. अंतिम सामन्यात इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं मुळीच सोपं नसतं. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. त्यामुळे सामन्यात असं फार काही घडलं नाही. पण अर्शदीप सिंगने डॅरिल मिशेलला मारून फेकलेला थ्रो चर्चेचा विषय ठरला. सामन्यानंतर अर्शदीप सिंगने डॅरिल मिशेलची माफी मागितली होती. पण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मते, माफी मागायची काहीच गरज नव्हती.

याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. पण सोशल मीडियाच्या जगात अशा सर्व गोष्टींवर जास्त चर्चा केली जाते. एएनआय पॉडकास्टमध्ये बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “हे योग्य होतं. तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरले आहात. देशाचं प्रतिनिधित्व करत असताना राग व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याने थ्रो बॅक केला, यात त्याचं काय चुकलं? कुठल्याही गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीवर २ षटकार मारलेलं आवडत नाही. मला माझ्या खेळाडूंकडून असात प्रतिसाद हवा आहे. यात काहीच चुकीचं नाही. त्याने मिशेलची माफी मागितली नसती, तरी फरक पडला नसता.”

हेही वाचा –  पार्किन्सनसवर स्टेम-सेलवर जपानची नवी उपचारपद्धती! मेंदूत नवीन पेशी निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानामुळे लाखो रुग्णांसाठी आशेचा नवा किरण…

तसेच तो पुढे म्हणाला की, “माफी मागितली हे पण उत्तमच आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर कोणीच मित्र किंवा शत्रू नसतो. तुमचं काम देशाचं प्रतिनिधित्व करणं आहे. अशा गोष्टी याआधीही बऱ्याचदा घडल्या आहेत. पण सोशल मीडियाच्या या जगात अशा गोष्टींची जास्त चर्चा होते. असं करण्याची आवश्यकता नाही.”

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५५ धावा केल्या होत्या. २५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला चांगली सुरूवात मिळाली नव्हती. डॅरिल मिशेलने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिशेलने अर्शदीपच्या षटकात लागोपाठ २ षटकार मारले. त्यानंतर अर्शदीपने वेगवान चेंडू टाकला. हा चेंडू खेळत असताना, डॅरिल मिशेलने क्रिझच्या बाहेर उभा होता. त्यावेळी चेंडू हातात येताच अर्शदीपने वेगाने यष्टीच्या दिशेने थ्रो केला. पण हा चेंडू यष्टीला न लागता मिशेलला जाऊन लागला. त्यावेळी मिशेल अर्शदीपच्या अंगावर धावून आला होता. सामना झाल्यानंतर अर्शदीपने जाऊन मिशेलची माफी मागितली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button