क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टाईम आउटमुळे बाद झाला अँजेलो मॅथ्युज

SL vs BAN : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३८वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू आहे. या सामन्यात असे काही घडले, जे पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही. श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी क्रिजवर आला, मात्र तो एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाइम आऊटमुळे अँजलो मॅथ्यूज याला बाद देण्यात आलं.
सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला. स्ट्राईक घेतली, पण हेल्मेटचा भाग तुटल्याचे लक्षात आले. त्यामुळे मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवले. यासाठी दोन मनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने पंचाकडे बादची दाद मागीतली. क्रिकेटच्या नियमांनुसार, कोणत्या फलंदाजाला दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घ्यावी लागते. पण हेल्मेट नसल्यामुळे मॅथ्यूजला स्ट्राईक घेता आली नाही. शाकीबने पंचांकडे दाद मागितली. नियमांनुसार, पंचांनी बाद दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झाल्यानंतर बाद देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा – छगन भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले..
Angelo Mathews leisurely walked out to the middle which took time, he had some issue with the helmet. He didn't reach the crease and called for another helmet.
– Bangladesh appealed for a time-out and the umpires followed the rules. pic.twitter.com/rrqtiIn2xX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
टाईम आऊट नियम काय आहे?
क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मिरिलिबोन क्रिकेट क्लबनुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणाऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर येणारा फलंदाज टाईम आऊट होईल. म्हणजेच, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी येतो. या बदलासाठी तीन मिनिटं मिळतात. पॅव्हेलियनमध्ये तयार असलेल्या फलंदाजाला क्रीझवर पोहोचण्यासाठी हा वेळ मिळतो. त्यावेळेत फलंदाज जर मैदानात खेळायला पोहोचला नाही तर त्याला टाईम आऊट दिलं जातं.





