breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

छगन भुजबळांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी पूर्ण ऑडिओ क्लिप ऐकली नाही. पण, ‘करेंगे मरेंगे’ हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राज्यात अशांतता पसरवायची असेल. पण, आमचं ‘लढेंगे आणि जितेंगे’ हेच वाक्य आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार. आमचे आंदोलन थांबणार नाही.

हेही वाचा – ‘नारायणा स्कॉलिस्टीक शिष्यवृत्ती उच्च शिक्षणासाठी उपयुक्त’; शंकरसिंह राठोड 

कितीही एकत्र आले, दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि ताकदीनं मराठ्यांविरोधात उभारण्याचा प्रयत्न केला, तर आमचं लक्ष विचलित होणार नाही. मराठा आरक्षण मिळवणे हेच आमचं लक्ष आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

काही नाही, ती सगळी मंडळी आली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आता आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोय आहे, आवाज उठवा. एकटा कुठपर्यंत वेळ काढणार. आता तालुका-तालुक्यातून, गावागावातून ज्या पद्धतीनं बुलडोझर चालवले जात आहेत, त्यामधून ओबीसी काय वाचणार नाही आता. त्यामुळे आता ‘करेंगे या मरेंगे’ हेच केलं पाहिजे. काय असंही मरतंय, तसंही मरतंय. मी याविरोधात आता उभा राहतोय, असं छगन भुजबळ कार्यकर्त्याला सांगताना ऐकायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button