ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

माळी समाज वधु-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पत्रिका जुळविण्यापेक्षा मने जुळवून घेणे गरजेचे - दीपकनाना कुदळे

पिंपरी : महात्मा ज्योतीराव फुले मंडळ आयोजित माळी समाजाचा वधु-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उदघाटन प्रसंगी माजी महापौर अपर्णा डोके, अनिता फरांदे, उद्योजक दीपकनाना कुदळे, आयसीएआयच्या पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी, उद्योजक प्रशांत डोके, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, उद्योजक संजय जगताप,राजेश टिळेकर,सावता परिषदेचे प्रदेश सचिव गणेश दळवी, राजेश कर्पे, वंदना जाधव, चंद्रकांत वाघोले, माळी समाज मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपकनाना कुदळे म्हणाले कि, विवाह जुळविणे ही जटील समस्या बनली आहे. पत्रिका जुळविण्यापेक्षा मने जुळवून घेणे गरजेचे आहे.

सुहास गार्डी म्हणाले की, पालकांनी मुलांना दैनंदिन जीवनात तडजोड, त्याग आणि संयम याची शिकवण आणि अमलबजावणी करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. त्याचा त्यांना वैवाहिक जीवनात निश्चितच उपयोग होऊ शकतो.उच्च शिक्षण, चांगली नोकरी असतानाही मुलांची विवाह जमण्यास वेळ लागत आहे, अशा वेळेस पालकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत माळी यांनी तर स्वागत सूर्यकांत ताम्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा चव्हाण तर आभार विश्वास राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीहरी हरळे, प्रसाद सत्रे, प्रकाश गोरे, अशोक टिळेकर, राजेंद्र जमदाडे, अनिल साळुंके, नितीन ताजने, राजेंद्र बरके, महादेव भुजबळ, शंकर भुजबळ, वैजनाथ माळी, अमर ताजणे, हरेश शिंदे, कैलास पेरकर, नवनाथ कुदळे, प्रदीप दर्शले, निलेश डोके, नरहरी शेवते, सोमनाथ शिरसकर, दिलीप भोसले, प्रमोद माळी, परेश ताम्हाणे,किशोर माळी, बाबासाहेब पिंगळे, रमेश गायकवाड, गोरक्ष गोरे, महिला सखी मंचच्या महिला अनिता ताटे, स्मिता माळी, अलका ताम्हणे, नेहा भुजबळ, आशा माळी, उर्मिला भुजबळ, कुंदा यादव या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button