breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘‘बाबरी’’ पाडली त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : रामजन्मभूमी अयोध्येत पाचशे वर्षांपूर्वी मुघल सम्राट बाबराचा सेनापती मीर बाँकी याने बांधलेली बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी बरोबर २८ वर्षांपूर्वी धार्मिक उन्मादात जमीनदोस्त केली. सहा डिसेंबर १९९२ रोजी ही घटना घडली होती. मात्र, बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पाटील बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, बाबरी मशीद जर शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्याचा अभिमान आहे. याचा अर्थ शिवसैनिक किंवा बाळासाहेब मशीद पाडण्यासाठी गेले नव्हते. कार सेवक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मशीदीचा ढाचा पाडला होता. मी स्वत: त्या ठिकाणी महिनाभर राहिलो होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button