breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

सोनाक्षी सिन्हाच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रासिटी अंतर्गत फिर्याद दाखल

कोर्टाचे फेरतपास करण्याचे आदेश

बारामती : एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या विरोधात अ‍ॅट्रासिटी अंतर्गत फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणी बारामती जिल्हासत्र न्यायालयाने शहर पोलिसांना फेर तपासाचे आदेश दिले आहेत. याबाबत विश्वास उद्धव लालबिगे यांनी अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांच्यामार्फत बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, एका मुलाखतीमध्ये वक्तव्याबाबत हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या विरोधात अ‍ॅट्रासिटी अंतर्गत विश्वास उद्धव लालबिगे यांनी अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांच्यामार्फत बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिशांनी बारामती शहर पोलिसांना सीआरपीसी कलम २०२ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र बारामती शहर पोलिसांनी २०२ अंतर्गत दाखल केलेल्या अहवालामध्ये सोनाक्षी सिन्हा हिने त्या मुलाखतीत विशिष्ट जातीचा उल्लेख केला आहे. मात्र कोणताही गुन्हा केल्याचे दिसत नाही, असे नमुद केले होते. मात्र अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी पोलिसांनी केलेल्या तपासावर शंका व्यक्त करत सोनाक्षी सिन्हा यांचा जबाब न घेताच पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

कोणताही तपास न करता सोनाक्षी सिन्हा हिचा जबाब न घेताच पोलिसांनी हा निष्कर्ष कसा काढला असा सवाल हेमचंद्र मोरे यांनी उपस्थित केला. पोलीस स्वत:च न्यायाधीश व आरोपींचे वकील असल्यासारखे गुन्हा घडला नाही, असे म्हणतात ही बाब तपासावर शंका निर्माण करणारी आहे, असे अ‍ॅड. मोरे यांनी नमूद केले होते. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनीही बाब मान्य करत पोलिसांना या प्रकरणी फेर तपासाचे आदेश दिले आहेत. सीआरपीसी कलम २०२ अन्वये पुन्हा तपास करून याबाबतचा अहवाल न्यायालयास ३१ मे २०२३ रोजी अथवा त्यापूर्वी सादर करण्याचे आदेश बारामती शहर पोलिसांना देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button