breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

तृप्ती देसाई बारामतीत सुप्रीया सुळेंना देणार आव्हान!

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरूद्धच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. तेव्हापासून अनेक आंदोलन आणि वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेत असतात. आता बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. खूप चांगलं काम चाललंय किंवा खूप वाईट काम सुरू आहे, असं मी म्हणणार नाही. दरम्यान, तृप्ती देसाई म्हणाल्या की, कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच.

आजच आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारामतीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं त्यांनी मला सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. आगामी काळात धनशक्ती विरूद्ध जनशक्ती आणि घराणेशाही विरूद्ध लोकशाही अशीच निवडणूक होऊ शकते, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button