breaking-newsक्रिडा

व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धा: अजय जयरामला अखेर उपविजेतेपद

गॅटचिना: दुखापतीतून पुनरागमन करीत असलेला भारताचा गुणवान खेळाडू अजय जयरामला येथे पार पडलेल्या व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अजयने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. परंतु अंतिम लढतीत त्याला स्पेनच्य अग्रमानांकित पाब्लो एबियनविरुद्ध 21-11, 16-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.

गेल्या वर्षी विश्‍वक्रमवारीत 13व्या क्रमांकापर्यंत प्रगती करणाऱ्या अजय जयरामला मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे पहिला धक्‍का बसला. त्यानंतर गुडघ्याची जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे त्याची आणखी पीछेहाट झाली. इतकेच नव्हे तर तब्बल सहा महिने तो स्पर्धात्मक बॅडमिंटनलाही मुकला. परिणामी विश्‍वक्रमवारीत त्याची 96व्या क्रमांकापर्यंत घसरगुंडी झाली. दुखापतीतून बरा झाल्यानंतर त्याने यंदाच्या एप्रिल महिन्यात अमेरिकन ओपन स्पर्धेतून पुनरागमन करताना उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारली.

आता व्हाईट नाईट्‌स स्पर्धेतील उपविजेतेपदामुळे अजयचे मनोधैर्य उंचावले असून आगामी काळात सुपर-100 आणि सुपर-300 दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जोरदार पुनरागमन करम्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर रशियन ग्रां प्री स्पर्धेतही सहभागी होण्याचा त्याचा मनोदय आहे. त्यामुळे विश्‍वक्रमवारीतील मानांकन सुधारण्यासाठी या स्पर्धेतील कामगिरीचा उपयोग होऊ शकेल.

दरम्यान व्हाईट नाईट्‌स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीत तरुण कोना आणि सौरभ शर्मा या भारतीय जोडीचे आव्हान उपान्त्य फेरीत संपुष्टात आले. बियार्ने गेईस आणि यान कॉलिन व्होल्कर या जर्मन जोडीने भारतीय जोडीचा कडवा प्रतिकार 21-18, 13-21, 17-21 असा मोडून काढताना अंतिम फेरीत धडक मारली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button