breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखांची लाच स्वीकारताना अटक

आमदाराच्या घरात सापडलं ६ कोटींचं घबाड!

काही महिन्यांत कर्नाटक विधानसभा निवडणुकांना होणार आहेत. तत्पुर्वी राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील भाजप आमदारंच्या पुत्राला ४० लाखांची लाच स्वीकारताना पोलिसांनी अटक केलं आहे.

कर्नाटकमधील चन्नागिरीचे भाजपा आमदार के मडल विरूपक्षप्पा यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे. लाच स्वीकारण्याचं काम थेट आमदारांच्या कार्यालयातच चालू होतं. ही लाच आमदार महोदयांसाठीच स्वीकारली जात असल्याचा दावाही केला जात आहे.

तसेच, यानंतर प्रशांत यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ६ कोटी रूपये सापडले आहेत. ज्या व्यक्तीकडे लाच त्यांनी मागितली होती, त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्यावरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्त पोलिसांनी क्रेसेंट रोडवरील विरूपक्षप्पा यांच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी प्रशांत ४० लाखांची लाच स्वीकारताना आढळून आले.

दरम्यान, प्रशांत यांनी तक्रारदाराकडून ८१ लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यातील चाळीस लाख रूपये देत असताना लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचे वडील अर्थात भाजपा आमदार विरूपक्षप्पा हे कर्नाटक सोप अँड डिटर्जेंट लिमिटेडचे संचालक असून घेतली जाणारी लाच त्यांच्याच नावाने घेतली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button