TOP Newsताज्या घडामोडीपुणे

100 कोटी रुपये खर्च करून पालिका स्वतः करणार पुण्यातील रस्त्याची दुरुस्ती

पुणे | पाणीपुरवठी जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्तेखोदाई करण्यात आली. त्यानंतर ठेकेदारांनी केलेली रस्त्याची दुरुस्ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. त्यामुळे कधी नव्हे तेवढे शहरातील रस्ते ‘खड्यात’ गेले आहेत. ठेकेदारांनी रस्तेदुरुस्तीचे काम चांगले केले नसल्यामुळे पालिकाच हे काम करणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.शहरात पुणेकर नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ‘सातही दिवस 24 तास पाणीपुरवठा’ ही योजना आखण्यात आली होती. त्या योजनेचे नाव बदलून आता ‘समान पाणीपुरवठा योजना’ असे करण्यात आले. पालिकेने दोन वर्षापूर्वी दोन हजार 100 कोटी रुपयांची

समान पाणीपुरवठा योजना सुरू केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या योजनेचे काम ठेवून सुमारे 50 किलोमीटर लांबीची जलवाहिनी शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर भागांत टाकली. समान पाणीपुरवठ्याचे काम ‘एल अॅण्ड टी’ कंपनीकडून सुरू असून, टाक्या बांधणे, जलवाहिनी टाकणे, पाण्याचे प्रेशर योग्य आहे की नाही तपासणे, योग्य त्या ठिकाणी व्हॉल्व बसविणे यांसह कामे व खोदलेले रस्ते सिमेंट काँक्रीट टाकून पूर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे.

जलवाहिनी टाकल्यानंतर खड्डा बुजविताना खडी टाकून त्यावर सिमेंट काँक्रीट टाकणे अपेक्षित होते. मात्र, बहुतांशी ठिकाणी खड्डा बुजविताना थेट माती टाकून खड्डा बुजविला आहे. तर, काही ठिकाणी खडी न टाकता थेट काँक्रीट टाकले जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खचल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ अली.

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून ओरड सुरू असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना रस्त्यावर उतरून शहरातील रस्त्यांची दुर्दशा कशा पद्धतीने झाली आहे, हे पाहिली. त्यामुळे पुढील दीड महिन्यात सर्व रस्ते दुरुस्त होतील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

‘समान पाणीपुरवठा योजनेसाठी 1700 किलोमीटर लांबीचे रस्ते खोदावे लागणार आहेत. त्यापैकी सुमारे 550 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आणखी 1150 किलोमीटरची रस्तेखोदाई भविष्यात केली जाणार आहे. ठेकेदारांनी रस्तेदुरुस्तीचे काम चांगले केले नसल्यामुळे पालिकाच हे काम करणार आहे. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे पैसे संबंधित खोदाई करणाऱ्या ठेकेदाराकडून घेतले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button