breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : राजस्थानपुढे आज बंगळुरुचं तगडं आव्हान

दुबई – इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात होणाऱ्या डबर हेडरमधील आज पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना राजस्थानसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात बंगळुरूही विजयासाठी प्रयत्न करणार आहे.

शेवटच्या सामन्यात बंगळुरूचा किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभव केला होता. या सामन्यात बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सला खाली पाठविण्याच्या निर्णयावर टीका झाली होती. मात्र, सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने या निर्णयाचा बचाव केला. वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे यांना राजस्थानविरुद्ध डिव्हिलियर्सआधी पुन्हा पाठवले जाण्याची शक्यता नाही.

बंगळुरूची फलंदाजी फॉर्मात आहे, शेवटच्या सामन्यात संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने जात होता असे वाटत नव्हते, परंतु त्यानंतरच ख्रिस मोरिसने आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि फलंदाजीनेही तो किती महत्त्वपूर्ण खेळू शकतो हे सांगितले. त्याने आठ चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

बंगळुरूची गोलंदाजी मात्र पंजाबविरुद्ध चांगली कामगिरी करु शकली नाही. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सुरुवातीला त्यांचे मनोबल तोडले आणि नंतर ख्रिस गेलने बंगळुरूच्या गोलंदाजांना लक्ष्य केले.

फलंदाजीपूर्वी मॉरिसने बॉलने देखील चांगली कामगिरी केली. राजस्थानच्या फलंदाजांना युजवेंद्र चहलच्या स्पिनचा सामना करावा लागणार आहे. सुंदर आणि ईसूरु उदाना देखील फॉर्मात आहेत.

दुसरीकडे, राजस्थानचा संघ अद्याप चांगला खेळ करु शकलेला नाही. दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ते विजय होतील असं वाटत होतं पण शेवटी काही चुकांमुळे त्यांचा पराभव झाला.

राजस्थानसाठी जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनची फलंदाजीही अत्यंत महत्त्वाची आहे. रॉबिन उथप्पा संघासाठी काहीही करू शकला नाही. राहुल तेवतिया कधीही काहीही करू शकतो. असे त्याने दोन सामन्यांमध्ये सांगितले आहे. त्यामुळे बंगळुरूला शेवटपर्यंत राजस्थान हलक्यात घेता येणार नाही.

गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चरशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाने काही खास कामगिरी केलेली नाही. युवा कार्तिक त्यागीने मात्र नक्कीच प्रभाव पाडला आहे आणि या सामन्यात तो जगातील दोन दिग्गज फलंदाजांसमोर कसा कामगिरी करतो हे पाहणे उत्सूकतेचं ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button