breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

समाजसेवक आकाश दीपक महालपुरे यांचे उध्दव ठाकरे यांना पत्र!

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक आकाश दीपक महालपुरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

आकाश दीपक महालपुरे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

मा. निलमताई गोऱ्हे म्हणजे,
मायेच्या ममतेनं समाजातील अनेक दुर्बलांना सुसह्य आयुष्याचे दूध पाजवणार्या माऊलीचं नाव..,
आणि माझ्यासारख्या शेकडो मुसाफिराचं अगदी हक्काचं मदतीतील विसाव्याचं ठिकाणं..!
उद्धव साहेब तुम्हाला सांगतो..,

माझ्यासारख्या छोट्याश्या खेडेगावातील अगदी मायानगरीपासून ५०० किमी अंतरावर असणार्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने ज्या ज्या वेळेस ताईंना मदतीसाठी आवाज दिला ना, त्या-त्या प्रत्येक वेळेस ताईंनी मला कसल्याही कारणांचा लेखाजोगा न मांडता अगदी आपलेपणाने, मायेने होकारा भरला. हे मी तुम्हाला कधीही,कुठेही अगदी पुराव्यासह प्रकट करून देईन. उद्धव साहेब मी ताईंना अजूनही प्रत्यक्ष भेटलो देखील नाही आहे किंवा आ.ताईंनी मला प्रत्यक्षात देखील बघितले नाही आहे. पण माहीत नाही,कधी-कधी वाटतं, काय कुठल्या जन्माचं नातं असेल माझं या माऊलीशी माझं..! जी आजही या क्षणाला माझ्यासारख्या छोट्याश्या मुलाला आईच्यामायेने सदैव प्रेम देण्यासाठी सज्ज आहे.

उद्धव साहेब तुम्हाला सांगतो..काल-पर्वाची घटना दवाखान्यातील लहान-भावाच्या मदतीसाठी निलम ताईं ना फक्त मेसेज केला, ताईंनी लगेचचं होकारा भरला,आणि सदरील डॉक्टरांशी बोलणे देखील करून घेतले,आजकाल कोणं करतं एवढे सांगा ना,पण “मा.ताईं”नी माझ्यासाठी केले.

(जे तुमच्या जवळच्या माणसांपैकी कोणीचं केले नाही, जवळचे माणसे तर सोडाचं आमच्या लोकप्रतिनिधी आमदार महोदयांनी देखील केले नाही)

हेही वाचा – Tulja Bhavani Mandir : आई तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेची दरवाढ रद्द

येणार्या काळात ताईंसाठी मला खूप काही करायचे आहे. मान्य आहे ना, कोणाच्या तरी म्हणण्यावरून ताईंनी राजकारणातील नेते नाही जोडले, पण माझ्यासारखा ५०० किमी अंतरावरच्या मदतीचा भुकेला माणूस तर जोडला,याचा माझ्यासारख्या माणसाला अभिमान देखील तर आहे ना असो. साहेब माझ्या निरीक्षणानुसार शेवटी एवढेचं..

निलमताई गोऱ्हे हे समाजातील एका उत्तुंग, हुशारी, साहसी, सामर्थ्य, विचारी आणि बुद्धिमत्तेच्या पर्वाचे नाव आहे. आयुष्य क्षणभंगुर आहे, असे आपण म्हणतो. पण ते आयुष्य जगण्याची प्रेरणाही असू शकते. ते ताईंच्या जगण्यावरून सिद्ध होते. आपल्या पदाचा कुठेही लौकिक करूनही ताईंची दृष्टी विलक्षण आहे. आचार आहे, ताईंकडे विचार आहे. ताईंनी भेटलेल्या प्रत्येक माणसाची नाडी ओळखली आहे. ताईंनी सेवेचे,जबाबदारीचे मोल जाणले आहे. ताईचे जगणे म्हणजे, शब्दचि अमुच्या जिविचे जीवन, शब्द जादू बन जनलोका.! या तुकोबारायांच्या शब्दांचे सार आहे. खरतरं माझा आणि ताईंचा खुप कमी दिवसांचा संवाद आहे, पण ताई नेहमी असं म्हणतात, मी सर्वांसारखीचं एक सर्वसामान्य महिला आहे आणि तोच माझा वर्तमान आहे.

ताईच्या मनात कधीचं कुणाबद्दल द्वेषभावना नाही.मत्सर नाही. ताईं सच्चा आणि निगर्वि आहेत. खरतरं समाजातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पणतीच्या प्रकाशासारखी ताईंची वाटचाल आहे.इतका विनम्रभान ताईच्या जगण्यात आहे. खरतरं, प्रत्येकाचा कल्पनेत एक देव असतो..

एक आकार असतो..एक साचा असतो.. तशीच माझ्या स्वप्न आणि मदत व्याख्येत पूर्ण-विरामाच्या जागी निलम-ताई आहेत.
ताईंनी खरंतर, त्यांच्यातील असलेल्या सर्वगुणांनी कर्तव्यदक्ष विशेष लोकप्रतिनिधी (४ वर्ष) म्हणून आपलं आयुष्य उलगडून ठेवलं तेव्हा खरतरं माझ्या डोळ्यातं पाणी तरळलं. खरतरं, कमेंट मध्ये त्यावेळेस ताईं बद्दल काय लिहावं सुचत नव्हतं..पण अभिमान वाटला ताईं आजही या वयात एका कुंटूंबप्रमुखाची, एका मायेची जबाबदारी सांभाळून धीराने आपली सेवा करतायं.!
ताईना मिळालेलं बुद्धिमत्तेचे, कर्तव्यदक्षाचे देणे तर अप्रतिमच आहे.

आज त्यांच्याबद्दल खरतरं,हे लिहीतांना मला सारखं सारखं भरभरून येत होतं. कारण त्यांच्या प्रत्येक कामात आपुलकी, आपलेपणा हृदयाशी जाणवत राहतो. खरचं, निलम-ताईंना त्यांच्या जगण्याचं मर्म खुप मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. नवी स्वप्न मिळून देणार्या सच्च्या पूर्ण-विरामातील समाज-सेवकाला अर्थात आमच्या मार्गदर्शक ताईंना निलम-ताई यांना पुढील वाटचालीसाठी दीर्घायुषी शुभेच्छा..!!

आकाश दीपक महालपुरे.

मो.नं..7588397772

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button