breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘शिवनेरी’च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा, खासदार अमोल कोल्हेंची संसदेत मागणी

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करण्यात यावी, अशी मागणी शिरुरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत केली. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यानूसार त्या आश्वासनाची मागणी त्यांनी लोकसभेत केली.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरु झाले आहे. कोल्हे यांनी आपल्या पहिल्या भाषणात शिवसृष्टीची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, शिवसृष्टीच्या निर्मितीमुळे जगाला छत्रपती शिवरायांचा जीवनपट अनुभवता येईल. तसेच, रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालनाही मिळेल, असे म्हणत अमोल कोल्हेंनी आपला मुद्दा लावून धरला.

आबाल-वृद्ध, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करून द्यावी, अशीही आग्रही मागणी कोल्हेंनी संसदेत केली. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ला हा मराठीजनांसाठी स्फुर्तीस्थान असून जगभरातील शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान मानले जाते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button