breaking-newsTOP Newsदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण, महाराष्ट्रात कुठे?

देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एफएम ट्रान्समीटर

दिल्ली : देशभरातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ करण्यात आला आहे.

देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा अशा ७ ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या लोकार्पणप्रसंगी प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, ऑल इंडिया रेडिओच्या या एफएम प्रसारणाचा शुभारंभ म्हणजे देशातील ८५ जिल्ह्यांतील २ कोटी नागरिकांना भेट असल्याचे त्यांनी सांगितले. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार एक महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळून हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, असं ते म्हणाले. माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button