breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Man Of Commitment : पिंपरी-चिंचवडचा ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ आमदार महेश लांडगेंकडून स्थायी समितीवर कट्टर समर्थकाला संधी!

ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांचा स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल

अर्ज भरण्यासाठी चिंचवड आणि भोसरीमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चूरस

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ Man Of Commitment अशी ओळख असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी कट्टर समर्थक व ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना स्थायी समिती सभापतीपदी संधी दिली आहे. सत्ताधारी भाजपाकडून ऐकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे लोंढे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या संतोष लोंढे यांचा अर्ज सोमवारी) दाखल करण्यात आला आहे.  त्यावर अधिकृतरित्या शुक्रवारी (दि.6) शिक्कामोर्तब होईल. लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुर्डे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांची स्वाक्षरी आहे.

यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, मावळते स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी महापौर राहुल जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.

भोसरी विधानसभेत तिसऱ्यांना सभापती…

महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे संतोष लोंढे यांना सभापतीपदाची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, सीमा सावळे, विलास मडिगेरी आणि संतोष लोंढे यांच्या रुपाने स्थायी समिती सभापतीपदावर भोसरीने तिसऱ्यांदा वर्चस्व मिळवले आहे.

महेश लांडगे यांनी शब्द पाळला…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्यामुळे महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक- पदाधिकाऱ्यांनी समर्थन दर्शवले होते. पक्षशिस्तभंगाच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी लांडगे यांच्यासाठी निवडणुकीत ‘घाम गाळला’ होता. ‘मी आमदार झालो, तर महापालिकेतील पदांसाठी कुणाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही’, असा शब्द त्यावेळी महेश लांडगे यांनी समर्थकांना दिला होता. दरम्यान, २०१७ मध्ये लांडगे यांनी भाजपा प्रवेश केला. महापालिकेत सत्ता मिळवली आणि महापालिकेतील सत्तेच्या तीन वर्षांच्या काळात आपल्या समर्थक नगरसेवकांना महापालिकेतील मानाची पदे देण्याचा ‘शब्द’ पूर्ण केला.

‘ही’ पदे मिळवली  आमदार लांडगे समर्थकांनी…

महापालिका सत्तेतील तीन वर्षांच्या कार्यकाळात आमदार लांडगे समर्थक नगरसेवकांमधून नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौरपदाची संधी दिली होती. त्यानंतर क्रीडा समिती सभापती म्हणून लक्ष्मण सस्ते, संजय नेवाळे, शहर सुधारणा समितीवर राजेंद्र लांडगे आणि सागर गवळी, शिक्षण समितीवर सोनाली गव्‍हाणे यांना संधी दिली होती. महिला व बाल विकास समितीवर स्वीनल म्हेत्रे यांना जबाबदारी दिली होती. तसेच, महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीवर अनेकांना सदस्यपदी काम करण्याची संधी महेश लांडगे यांनी अवघ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात दिली आहे.

६ मार्चला महापालिकेत भोसरीकर भंडारा उळणार…

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली आहेत. 6 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे ६ मार्च रोजी भोसरीकर पुन्हा एकदा महापालिका भवन परिसरात भंडारा उधळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button