breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

“…तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते”

मुंबई – काही जण कोरोनाच्या भीतीने घराबाहेर देखील पडले नाहीत. पण नंतर त्यांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कोरोना हवेतून पसरतो का? यावर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. WHO ने कोरोना हवेतून पसरत नाही, अशी माहिती सुरूवातीला दिली होती. त्यानंंतर आता कोरोना हवेतून पसरत असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग हवेतूनही होतो. संसर्गित व्यक्तीच्या नाकातल्या स्रावातून, ड्रॉपलेट्समधून पसरतो, हे लक्षात घ्यायला हवं. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ यावर चर्चा सुरू आहे, की कोरोना कसा पसरतो. माझ्या मते कोरोना हा पृष्ठभाग आणि हवा अशा दोन्ही माध्यमातून पसरतो. एखादी व्यक्तींमध्ये लक्षणं दिसत नसली, तरी ते कोरोनाचे वाहक असू शकतात. ते घरात येऊन संसर्ग पसरवू शकतात, असं गुलेरिया म्हणाले.

सुरुवातीला ड्रॉपलेट थिअरीवर भर दिला गेला होता. शिंकण्या-खोकण्यातून बाहेर आलेले ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडून, तिथून इन्फेक्शन पसरत होतं. त्यामुळे सुरुवातीला पृष्ठभाग डिसइन्फेक्ट केले जात होते. पण गेल्या काही महिन्यांमधल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, की एअरोसोल्स अर्थात पाच मायक्रॉनपेक्षा लहान आकाराच्या कणांद्वारेही तो पसरू शकतो. हे कण हवेत जास्त काळ राहू शकतात, असंही गुलेरिया म्हणातात.

शारीरिक अंतर, मास्क घालणं, हातांची स्वच्छता या उपायांचा कायम अवलंब करायला हवा. घरातली हवा खेळती राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कारण त्यामुळे घरातल्या हवेत चुकून संसर्ग पसरला असेलच, तर तो बाहेर जाऊ शकतो. टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही येणार असाल, तर त्या सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्हच आहेत, असं समजूनच वागायला हवं, असा सल्ला डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button