breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला गर्भीत इशारा; पुरावे द्या चौकशी लावतो!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘बरंच काही चाललंय’

भाजपा आमदारांनी केलेल्या चुकांवर बारीक लक्ष

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बरंच काही चाललं आहे, असे कानावर येते. फक्त कानावर येवून  चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो, असे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते. बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून कंत्राट घेत काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यातील 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. तर, फसवणूक केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार महापालिकेने पोलिसांकडे दिली आहे.

याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ”बोगस एफडीआर प्रकरण दाखवा. त्याचे पुरावा द्या. चौकशी लावतो. तसेच महापालिकेत बरंच काही चाललं आहे. असे कानावर येते. फक्त कानावर येवून  चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button