breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवडमध्ये लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. चिंचवडमधील दवाबाजार येथे सहा वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली असून चॉकलेटचे आमिष दाखवून नराधम तिला घरी जायचा. या प्रकरणी निगडी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

चिंचवडच्या दवाबाजार परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर मोहसीन शेख या नराधमाने बलात्कार केल्याचे समोर आले. २९ सप्टेंबरपूर्वी दोन ते तीन महिन्यांपासून हा प्रकार घडत होता. चॉकलेटचे आमिष दाखवून हा नराधम त्याच्या घरात मुलीला घेऊन जायचा आणि त्या मुलीवर बलात्कार करायचा. हा प्रकार मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी रात्री उघड झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

पिंपरी- चिंचवडमध्ये लहान मुलीवरील बलात्काराची गेल्या २४ तासांमधील दुसरी घटना आहे. यापूर्वी पिंपरीतील नागसेन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला मंगळवारी संध्याकाळी एका नराधमाने भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणातील नराधमाला अटक करण्यात आली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button