breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारतात कोरोनाची परिस्थिती गंभीर, ट्विटरवर #PakistanstandswithIndia टॉप टेनमध्ये

नवी दिल्ली – भारतामधील कोरोना परिस्थिती दिवसोंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत आणखी ३.३२ लाख जणांना कोरोनाची लागण झाली. हा एका दिवसातील उच्चांक असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २४ लाखांचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आणखी २२६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहून भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानमधून आता भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. शुक्रवारी रात्रीपासून सोशल नेटवर्किंगवर खास करुन पाकिस्तानमधील सोशल नेटवर्किंग ट्रेण्डमध्ये #PakistanstandswithIndia म्हणेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे.

पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी भारतांना धीर धरण्याचा, खचून न जाण्याचा सल्ला देताना #PakistanstandswithIndia हा हॅशटॅग वापरला आहे. अनेकांनी शेजरी म्हणून आम्ही या संकटाच्या कालावधीमध्ये भारतासोबत आहोत असं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button