breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…तर आजपर्यंतच्या सर्वच स्थायी सभापतींची ‘नार्को टेस्ट’ करा; सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाकेंचा पलटवार

पिंपरी ।  प्रतिनिधी

भाजपने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने (Below) विकासकामे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची बचत झाली. याउलट राष्ट्रवादीच्या काळातील निविदा चढ्यादराने (Above) करून पालिकेची लुट केली आहे. याचा हिशोब राष्ट्रवादीने द्यावा. स्थायी समिती सभापतींवरील कारवाईचे राजकीय षडयंत्र आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच सभापतींची नार्को टेस्ट करावी. त्यात खरं काय ते जगासमोर नक्कीच येईल, अशी प्रतिक्रीया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

महापालिकेतील सत्ताधारी भाजप, लाचखोरीत अडकलेले स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने आज (बुधवारी) आंदोलन केले. त्यावर प्रतिक्रिया देताना पक्षनेते ढाके म्हणाले, मुळात, स्थायी समिती संदर्भातील उपस्थित केलेला विषय हा संपूर्ण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चौकशीचा भाग आहे. स्थायी समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष अशा एकूण 16 सदस्यांचा समावेश आहे. हा सुद्धा चौकशीचा भाग आहे. संबंधित विभाग याबाबत चौकशी करीत आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका अगोदरच भाजप नेतृत्वाने स्पष्ट केलेली आहे.

खरंतर या पाच वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाने संपूर्ण शहराचा ‍विचार करून योग्य प्रकारे विकास कामांचे नियोजन केले. महापालिकेचा निधी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. या पाच वर्षाच्या काळात भाजपने स्थायी समितीमध्ये उतरत्या दराने (Below) विकासकामे केल्यामुळे मोठया प्रमाणात निधीची बचत झाली आहे. याउलट राष्ट्रवादीच्या काळातील निविदा चढया दराने (Above) करून मनपाची लुट केली आहे. याचा हिशोब राष्ट्रवादीने द्यावा.

स्थायी समिती सभापतींवरील कारवाई हे एक राजकीय षडयंत्र आहे. खरतर चौकशीच करायची असेल तर पाच वर्षाचीच काय महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या सर्वच स्थायी समितींच्या कामांची चौकशी लावावी. आत्तापर्यतच्या सर्वच सभापतींची नार्को टेस्ट सुद्धा करावी. खरं काय ते जगासमोर नक्कीच येईल, असे ढाके म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button