breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिरूर लोकसभेसाठी पैलवान आमदारांची “रंगीत तालीम”

  • भोसरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
  • खासदारकीच्या उद्दीष्टासाठी प्रयत्न पनाला

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दंड थोपटले आहेत. स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी खासदार होण्यासाठीचे जोरात “ब्रँडींग” केले आहे. भाजप, शिवसेना युती न झाल्यास भाजपच्या तिकिटावर ते शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ते तयारीत असल्याचे त्यांच्या हालचालींवरून स्पष्ट होत आहे.

मावळ आणि शुरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी प्राधिकरणात मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन फोडला. त्यातच महेश दादांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 27) आहे. त्यानिमित्त दादांनी भोसरी परिसरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भोसरी विधानसभेसह कार्यक्रमाची जाहीरातबाजी शहरभर केली आहे. त्यांच्या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. महिला वर्गाने देखील पुढाकार घेतला आहे. सर्वत्र फ्लेक्सबाजी झळकत आहे. त्यात महेश दादा शिरूरचे भावी खासदार असल्याचाही एक फ्लेक्स लक्षकेंद्रीत करत आहे. जर दादा शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. तर, हे भरगच्च कार्यक्रम भोसरी विधानसभेत आयोजित करण्यामागचा त्यांचा हेतू राजकीय जाणकारांना स्पष्ट संकेत देऊन जात आहे.

महेश दादा आमदार झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना चुचकारून “आता उद्दीष्ट शिरूर लोकसभेचे”, असा इशाराच त्यांनी दिला होता. त्यावर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांच्या भूमिकेबद्दल अस्था निर्माण झाली होती. मात्र, दादांनी मधेच मागार घेऊन मौनावस्था धारण केली होती. त्यावर पुन्हा दादा शिरूरचा गड शिवसेनेलाच सोडणार काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. आता दादांनी यु टर्न घेऊन पुन्हा शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी रंगीत तालीम सुरू केली आहे. वाढदिवसानिमित्त लोकसभेचे मोठ्या प्रमाणात ब्रँडींग केले आहे. दादा आता खासदार व्हावेत, अशी इच्छा देखील कार्यकर्त्यांनी प्रकट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button