breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

सप्तर्षी फाउंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य शिबिर व सॉफ्टवेरचे सादरीकरण संपन्न

खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती

दिव्यांग बांधवांना मिळणार आरोग्य विमा क्लेम सुविधा मोबाइल ॲप द्वारे

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी, पुणे यांच्यातर्फे दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीमती लक्ष्मीबाई बारणे उद्यान, थेरगाव येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरीता १० वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ७६ दिव्यांग बालकांना मोफत उपचार देण्यात आले. या शिबिराची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून केली या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांग बालकांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात.

सदर शिबिर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ. सम्युयल हनिमन्न यांच्या प्रेरणेने आयोजित केले जाते. सदर शिबिर संपन्न होण्यासाठी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे संचालक डॉ. अमरिश विजयकर तसेच पुणे शाखा प्रमुख डॉ. रजत मालोकार यांनी पुढाकार घेतला.

शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, या सोबत प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ. रजत मालोकार, उद्योजक विशाल मसुळकर, वाकड पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक श्री. राजेश मसाळ , झेब्राथोट सॉफ्टवेरचे गणेश बोरसे, राजेंद्र कोकाटे, विजय मुनेश्वर, सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्वाण दिव्यांग संस्था पुणे संस्थापिका ज्योती आघरकर यांनी केले.

सप्तर्षी फाउंडेशनचे प्रशासकीय प्रमुख रूशाली बोरसे, महेश चौधरी, शिल्पा चव्हाण, वर्षा चिंचकर, पूजा चिंचकर, रंजना सुतार, चंद्रिका शिर्के, श्रद्धा देशमुख, हर्षल सुरुषे, अविनाश वाल्हेकर, अश्विन वाल्हेकर यांनी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन केले.

हेही वाचा – ‘टोल एन्ट्री पॉईट्सवर सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावले जाणार’; राज ठाकरे 

तसेच सदर कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन या प्रोजेक्ट अंतर्गत बनविण्यात आलेले सॉफ्टवेरचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पा अंतर्गत दिव्यांग बांधवांना विविध प्रकारच्या शासकीय व खाजगी सोई सुविधा त्यांच्या मोबाइल मध्ये ॲप द्वारे उपलब्ध होणार असून सदर संकल्पना भारत सरकार कडून कॉपीराईट मान्यताप्राप्त असून लवकरच पेटंट नोंदणी करण्यात येईल. सदर प्रकल्पांतर्गत सर्व प्रकारच्या सर्व शासकीय स्तरावरच्या विविध योजना एक क्लिकवर उपलब्ध होणार असून विविध आरोग्य विमा योजनांची सर्व प्रकारची माहिती व क्लेम सेवा एकाच ठिकाणाहून मिळणार असल्याने दिव्यांग बांधवांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी लागणारे विविध कागदपत्रांसाठी संपूर्ण सहयोग या प्रकल्पातून दिव्यांग बांधवांना मिळणार आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या दिव्यांग शिबिरांची माहिती तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था , व्यक्ति , वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था व व्यक्ति इत्यादि सर्व माहिती एक क्लीकवर मोबाइल मध्ये उपलब्ध होणार आहे, यामुळे लाभार्थी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ति यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सदर प्रकल्प भारतातील पहिला प्रकल्प असून पिंपरी चिंचवड परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे श्री. मनोजकुमार बोरसे सर यांनी सादरीकरणा दरम्यान सांगितले.

या प्रकल्पांतर्गत सप्तर्षी फाउंडेशनने विकसित केलेले सॉफ्टवेअर व मोबाईल ॲपचे सादरीकरण लवकरच महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष माननीय श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सादर करण्यात येणार आहे अशी माहिती श्री. मनोजकुमार बोरसे यांनी दिली.

सदर शिबिरासाठी ‘निमित्त वाढदिवसाचे, फेडुया ऋण समाजाचे’ या संकल्पने अंतर्गत ज्ञानेश ठाकूर, राजेंद्र कोकाटे यांनी आपल्या मुलांच्या (अव्यान आणि स्वरांश) वाढदिवसाला आलेल्या पाहुण्याकडून गिफ्ट स्वीकारण्याच्या ऐवजी सामाजिक प्रकल्पाला दान देण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश ठाकूर यांच्या कल्पकतेतून व सामाजिक जाणिवेतून सदर विचार निर्माण झाला जो त्यांनी श्री मनोज बोरसे यांना बोलून दाखविला आणि या शिबिराच्या खर्चाचा मोठा वाटा या संकल्पनेमुळे उपलब्ध झाला. या व्यतिरिक्त निर्वाण दिव्यांग संस्थेच्या वतीने ज्योती आघरकर, नलिनी ठाकूर, डॉ. भावना तायडे, श्रद्धा देशमुख, मंगेश सुरवसे या दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहयोग प्राप्त झाला.
संस्थेचे संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई मुळे, सचिव श्रीकांत चव्हाण व सदस्य वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.

अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकेतस्थळावर https://saptrishifoundation.in/ तसेच Saptrishi Foundation या YouTube माध्यमावर भेट देऊ शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button