ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

बहिणीच्या लग्नाची धामधूम आणि चुलत भावाचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

जळगाव | एकीकडे बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे चुलत भावाचा घरात आंघोळ करतांना हिटरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. प्रणव मुकुंदा पाटील (वय-१३) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे. आनंदाचे वातावरण असतांना अचानकच्या दुर्देवी घटनेने लग्न घरात शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, ममुराबाद येथे मुकूंदा दामू पाटील हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रविवारी १७ एप्रिल रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव हा घरी एकटाच होता.

नातेवाईक बाथरुमला आल्याने घटना उघड…

सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव आंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला सुरु असलेल्या हिटरमुळे वीजप्रवाह उतरल्याने जोरदार विजेचा धक्का बसला व यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, लग्नात आलेले नातेवाईक रविंद्र पाटील हे घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रणवच्या पश्चात आई दिपाली, बहिण वैष्णवी, लहान भाऊ सोमेश असा परिवार आहे. लग्नामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना या घटनेने शोककळा पसरली आहे. बहिणीच्या लग्नापूर्वीच तिच्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button