breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,78,406 वर

  • मुंबईत 993, पुण्यात 757 नवे रुग्ण

मुंबई – शनिवारी दिवसभरात 5,548 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,78,406 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 7,303 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 74 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,10,353 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 43,911 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,23,585 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 993 नवे रुग्ण आढळले, तर 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,57,500 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,250 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 680 जण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2,27,822 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 18,753 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 757 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,23,577 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,880 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 757 रुग्णांपैकी 373 रुग्ण हे पुणे शहरातील असून 146 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. तर 193 रुग्ण हे ग्रामीण भागातील आणि 45 रुग्ण कंटेन्मेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button