ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर खुनी हल्ला

पुणे |  पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कौटुंबिक वादातून एका डॉक्टरने स्वतःच्या डॉक्टर असलेल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धानोरी परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर रवी भादवड (वय 36) याला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हे दोघेही डॉक्टर दांपत्य धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे राहायला आहेत. त्याच ठिकाणी त्यांचे क्लिनिक आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. याच कारणावरून रविवारी रात्री पत्नी झोपेत असताना डॉक्टर रवी भादवड यांनी तिच्यावर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत डॉक्टर रवी याला अटक केली आहे. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button