breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर

पुणे – इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली. श्रेयसवर शस्त्रक्रिया केली जाणार असून या शस्त्रक्रियेनंतर त्याला पूर्ण बरे होण्यास वेळ लागेल. यामुळे श्रेयस अय्यर इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील बाकीचे सामने खेळणार नाही. तसेच दुखापतीतून सावरण्यास आणखी वेळ लागल्यास ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाही श्रेयसला खेळता येणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

श्रेयस अय्यर हा इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर भारताचे क्षेत्ररक्षण सुरू असताना शार्दूल ठाकूरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला आणि चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात श्रेयसचा अंदाज चुकला. चेंडू त्याच्या डाव्या खांद्याला जोरात लागल्याने श्रेयस वेदनेने विव्हळला. या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर गेला आणि राखीव खेळाडू मैदानात आला. सामना संपेपर्यंत श्रेयस मैदानात परतला नाही. ग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील बाकीचे दोन सामने तो खेळणार नाही. यामुळे श्रेयसच्या ऐवजी संघात सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यर हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर हा दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button